लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या पथकाने हडपसर भागात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.

मोहन मारूती गोरे (वय १९, रा. हिंगणे खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गोरे सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी गोरे शेवाळवाडी परिसरात थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असून, तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. गोरे याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

हेही वाचा… पंतप्रधानांच्या हस्ते होणार चिंचवडमधील चापेकर बंधू स्मारकाचे उद्घाटन; स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडून ४१ कोटींचा निधी

दरम्यान, हडपसर भागात आणखी एका सराईताला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून सुरा जप्त करण्यात आला आहे. विशाल किशोर पुरबिया (वय २२, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, रमेश साबळे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A crime branch team caught a gangster who was preparing to commit a serious crime in hadapsar area pune print news rbk 25 dvr