पिंपरी :दापोडी येथील काटे वस्तीमध्ये श्वान चावल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तसेच वस्तीतून निघून जाण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी एका महिलेने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी दैनंदिन कामकाज करत असताना वस्तीत राहणाऱ्या महिलेने त्यांना बाहेर बोलवले. तुम्ही सांभाळत असलेला श्वान पतीला चावल्याचे कारण देत फिर्यादीशी भांडण सुरू केले. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीची आई आणि बहीण तिथे आल्या. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि वस्तीतून निघून जाण्याची धमकी दिली. त्याच वेळी फिर्यादीची घरमालकीण आरोपी महिला तिथे आली आणि तिनेही श्वानाच्या त्रासामुळे फिर्यादीला शिवीगाळ केली.
ताथवडेत सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण
ताथवडे येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण झाली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेसह दोघांविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ताथवडेतील एका सोसायटीत सुरक्षा रक्षक आहेत.
सोसायटीत राहणारे दोघे फिर्यादीजवळ आले. त्यांनी ‘रात्री फोनवर तूच होतास ना?’ असे म्हणत, आरोपी महिलेने तिच्या हातातील फायबरच्या जाड पाईपने फिर्यादीच्या हातावर, खांद्यावर आणि पाठीवर मारून जखमी केले. तसेच, आरोपीने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.