हुंड्यासाठी छळ केल्याने नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणारा गजाआड; साथीदार फरार

हर्षदा बधे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे. तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती आनंद बधे, सासू रंजना, सासरे कल्याण (तिघे रा. मातोश्री निवास, संकेत विहार सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वर्षा शिवरकर (वय २२, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आणि हर्षदा यांचा गेल्यावर्षी मे महिन्यात विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरू करण्यात आला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. छळामुळे हर्षदाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक टी. एन. खळदे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A newly married young woman commits suicide after being harassed by her father in law pune print news rbk 25 dpj