Premium

पिंपरी : भाजपाने अजित पवारांना पालकमंत्रीपद दिले, पण अधिकारही…; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा खोचक टोला

अजित पवार हे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराची ताकद वाढली आहे. अजित पवार हे पालकमंत्री झाले असले तरी त्यांना भाजपाने अधिकारही द्यावेत, असे तुषार कामठे म्हणाले.

Ajit Pawar guardian minister pune district
पिंपरी : भाजपाने अजित पवारांना पालकमंत्रीपद दिले, पण अधिकारही…; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा खोचक टोला (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. अजित पवार हे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराची ताकद वाढली आहे. अजित पवार हे पालकमंत्री झाले असले तरी त्यांना भाजपाने अधिकारही द्यावेत त्यानंतरच अजित पवार हे काम करू शकतील, असं खोचक विधान शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अजित पवारांकडे पालकमंत्रिपद आल्याने बारणे, लांडगेंची कोंडी?

हेही वाचा – मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला?…उमेदवारांची चाचपणी सुरू

गेल्या पाच वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. महानगरपालिकेत कोट्यावधींचा घोटाळा झालेला आहे. त्याची चौकशीदेखील अजित पवारांनी लावावी. व्यक्तिशः अजित पवारांना माझ्याकडून शुभेच्छा. अजित पवारांनी आता विकासाचे राजकारण करावे. वीस वर्षांपासून शहरात अनेक प्रलंबित प्रश्ने आहेत, ती मार्गे लावावीत. शहरातील अनधिकृत बांधकाम, पवना जलबंद प्रकल्प, रेडझोन, असे प्रश्न प्रलंबित आहेत, असे तुषार कामठे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar has been given the post of guardian minister of pune district sharad pawar group tushar kamthe has commented on it kjp 91 ssb

First published on: 05-10-2023 at 12:09 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा