मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या माजी आमदारासह तब्बल २७ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हे सर्वजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान यावरुन अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना पक्ष वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो असं सांगितलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांना यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “उद्या राष्ट्रवादीत काहीजण प्रवेश करणार आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. महाविकास आघाडीला कोणतीही अडचण न येता पक्ष वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्याप्रामाणे काँग्रेस आणि शिवसेनेलाही मुभा आहे”.

“काँग्रेस-राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर…”; जयंत पाटलांचं मोठं विधान

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला असून माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह २७ नगरसेवक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. २७ जानेवारीला सर्वजण मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

नितीन राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खात्याची तक्रार केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षात लवकरच आणखी काही प्रवेश होणार असल्याचं सांगितलं आहे. ते तर होणारच आहे. पक्षात प्रवेश होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसेल असं सांगताना ते म्हणाले की. “राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. प्रत्येक गुरुवारी मुंबईत मोठ्या संख्येने नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. सांगलीत पण काही दिवसात इनकमिंग झालेले दिसेल”.

विश्वजीत कदम यांच्या पराभवावर भाष्य

राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाने १० जागा जिंकल्या आहेत. कदम यांच्या पॅनेलला सहा जागा जिंकता आल्या. तर त्यांचे पारंपरिक विरोधक म्हणून देशमुख गटाने १० जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली आहे. विश्वजीत कदम यांच्या पराभवावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समजूतदार दाखवला असता तर भाजपाचा पराभव करणं शक्य होतं. आकडेवारी तेच दाखवत आहे. अशी त्रुटी राहणार नाही पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना काळजी घेईल”.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on congress corporators joining ncp in malegaon sgy
First published on: 26-01-2022 at 15:42 IST