पुण्याच्या आळंदीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्याचे पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे यांनी गाथा परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या सांगता समारंभास हजेरी लावली होती. टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन सादर झाल्यानंतर सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्या. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आळंदीत गाता परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या सांगता समारंभास आलेल्या आहेत. टाळ मृदंगाच्या गजरात कीर्तन सादर होत असताना स्वतः सुप्रिया सुळे या कीर्तनात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील देहूत कीर्तन सोहळ्यात तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे कीर्तन ऐकतांना बघण्यास मिळत आहे. टाळ मृदंगाच्या तालावर सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजवत कीर्तनात रमून गेल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alandi ncp mp supriya sule enjoying kirtan ceremony kjp 91 ysh