पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत एकत्र येण्याच्या कुठेही चर्चा नाहीत. बंद खोलीत पण चर्चा नाही आणि खुल्या उद्यानामध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय, अशी काही संधी नाही. पण राजकारणात कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, अशी टिप्पणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईव्हीएम विरोधात विरोधक एकत्र आले असून शरद पवार यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली, याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, आमचा विजय झाला तर त्यांना ईव्हीएम आठवते. कसबा जिंकले तर त्यांना ईव्हीएम आठवले नाही का? मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे उर्दूमध्ये फकल लागल्यामुळे टीका होत आहे. त्यावर पाटील म्हणाले, मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागले म्हणजे काय लगेच हिंदुत्व सोडले असे होत नाही. मुस्लीम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केले असेल म्हणून मालेगावमध्ये फलक लागले असतील.

हेही वाचा >>> वसंत मोरे यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन

महापालिका प्रकल्पांसदर्भात सोमवारी सहा बैठका

पुण्यातील वृक्षतोडीकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेशी जोडलेल्या विविध प्रकल्पांबाबत सोमवारी (२७ मार्च) सहा बैठका घेणार आहे. त्यामध्ये मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा या विषयांचा समावेश आहे. त्यामध्ये वृक्षतोड विषय पण घेणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anything can happen in politics comments chandrakant patil pune print news vvk 10 ysh