scorecardresearch

वसंत मोरे यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी नगरसेवक वसंत मोरे यांची भेट घेण्यासाठी पुण्याचा दौरा केला.

vasant more raj thackrey
वसंत मोरे यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी नगरसेवक वसंत मोरे यांची भेट घेण्यासाठी पुण्याचा दौरा केला. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या वसंत मोरे आणि पक्षाचे शहरातील पदाधिकारी यांच्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे खास वसंत मोरे यांच्यासाठी पुण्यात आले. कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी या केंद्राची सविस्तर माहिती घेतली.  

शहरातील नदी सुधार प्रकल्पाचा राज ठाकरे आढावा घेणार असून या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. या प्रकल्पांतर्गत सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याच्या कारणाने अनेक पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकल्पासंदर्भात मोरे यांनी राज ठाकरे यांना सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पासंदर्भात छायाचित्रे आणि माहिती राज ठाकरे यांनी मागून घेतली आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प संदर्भात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे लवकरच पुणेकरांना समजेल.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 14:47 IST

संबंधित बातम्या