पुणे : गावोगावी जाऊन नंदीबैल सोबत घेऊन नागरिकांशी संवाद साधणार्‍या व्यक्तींना आजवर आपण पाहत आलो आहे.त्यांना एका जागेवर राहण शक्य होत नाही.आज इथ तर उद्या दुसर्‍या ठिकाणी आजवर त्यांचा प्रवास चालत आला आहे.पण याच प्रवासात बीड जिल्हय़ातील आष्टी तालुक्यातील पाखसर गावातील सुभाष फुलमाळी हे कुटुंबीयांना पुण्यातील लोहगाव येथे कामानिमित्त घेऊन आले.सुभाष फुलमाळी यांनी पडेल ते काम करून तीन मुलांना लहानाचे मोठ केले.

आपल्याला कुस्ती क्षेत्रात नाव करता आले नाही.पण आपल्या तीन मुलांनी कुस्तीमध्ये नाव कमवाव,त्यासाठी सुभाष फुलमाळी यांनी पाला बाहेर कुस्तीच मैदान तयार करून मुलांना कुस्तीचाचे धडे देण्यास सुरुवात केली.याच पालाच्या बाहेरुन कुस्तीचा सुरू झालेला प्रवास,तो थेट बहरीन येथे झालेल्या एशियन युथ गेम पर्यत जाऊन पोहोचला आणि 17 वर्षीय सनी फुलमाळी यांनी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्या पार्श्वभूमीवर कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सनी फुलमाळी याचा जीवन प्रवास जाणून घेऊया,आमच कुटुंब आष्टी तालुक्यातील पाखसर या गावातून 15 वर्षापूर्वी पुण्यातील लोहगाव येथे कामानिमित्त आले.आमच्या कुटुंबीयांचा मूळचा व्यवसाय हा नंदीबैल हा गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधणे हा आहे. तसेच रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विकून,आमच्या कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह चालत आला.

माझे आजोबा आणि वडीलांना कुस्तीची आवड,तिच आवड माझे दोन्ही मोठे भाऊ आणि माझ्यात निर्माण झाली.त्यानंतर मी देखील कुस्ती क्षेत्राकडे वळलो.आम्ही तिघां भावांनी चांगली कुस्ती खेळता यावी,यासाठी माझ्या वडिलांनी आमच्या झोपडीच्या बाहेरच मैदान तयार केले.त्या ठिकाणी दररोज सकाळी आमचा सराव सुरू झाला.पण काही दिवसांनी मी रायबा तालीम येथे सराव करायला जायला लागलो.त्यानंतर संदीप भोंडवे यांच्या जाणता राजा या तालमीत जाऊ लागलो.संदीप भोंडवे यांना माझी कुस्ती आवडली आणि माझ्या घराची हालाकीच परिस्थिती ओळखून संदीप भोंडवे यांनी मला दत्तक घेतले.मागील आठ वर्षापासुन ते माझा सर्व खर्च करीत आले आहे.

संदीप भोंडवे हे मला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आले.माझा दररोजचा सराव सुरू होता.तर दुसर्‍या बाजूला आई वडीलांचे कष्ट दिसत होते.आपण कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमवायच हेच माझ्या डोळ्यासमोर होते.त्यानुसार दररोज सराव सुरू ठेवला.तर दुसर्‍या बाजूला माझ शिक्षण देखील सुरू ठेवल असून इयत्ता दहावी ची परीक्षा बाहेरुन देत आहे.मी काही महिन्यामध्ये एकामागून एक स्पर्धां जिंकत गेलो आणि माझी बहरीन येथे होणार्‍या एशियन युथ गेम करिता निवड झाली.या स्पर्धे करिता निवड झाल्याने मी खूप आनंदी होतो.कारण पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार होती.त्या संधीच सोन करायच ठरवल,त्यानुसार आणखी जोमाने सराव करीत राहिलो.बहरीन येथे आत्ता झालेल्या एशियन स्पर्धेत इराक, इरान,जपान, कोरिया आदी देशातील खेळाडू सोबत कुस्ती केली. इराणच्या पैलवाना सोबत माझी कुस्ती झाली आणि मी ती कुस्ती जिंकलो आणि सुवर्णपदक जिंकलो.ही स्पर्धा जिंकताच,माझे वस्ताद संदीप भोंडवे यांना फोन करून सांगितले. त्यानंतर आई वडील यांना फोन करून त्यांना माहिती दिली तेव्हा फोनवरच आई वडील रडू लागले.आत्ता माझं स्वप्न हे ऑलम्पिक स्पर्धा जिंकण्याच आहे आणि मी त्यासाठी अधिक कष्ट घेणार असल्याच त्याने सांगितले.