नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते, असं विधान केल होत. त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आज पुण्यातील डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

हेही वाचा- नितेश राणेंकडून अजित पवारांचा ‘धरणवीर’ म्हणून उल्लेख; संभाजी महाराजांवरील विधानानंतर म्हणाले; “थोडीजरी लाज…”

यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल जे विधान केले आहे.ते निषेधार्थ असून अजित पवार यांनी त्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागावी. मतांसाठी लाचार होऊन अजित पवारांनी विधान केल्याच आरोप यावेळी त्यांनी केला.