पुणे : पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील उड्डाण पुलाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सिद्धार्थ शिरोळे,आमदार हेमंत रासने यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
उड्डाण पुलाच्या उदघाटन कार्यक्रमातनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांनी एकत्रित इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास केला.
त्यावेळी अजित पवार यांनी इलेक्ट्रिक वाहनाचे स्टेअरिंग हाती घेऊन काही मिनिट पुलावरून प्रवास करित पुलाची पाहणी केली.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. तर देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत प्रवास केला आणि तुमच्या हाती पुन्हा एकदा स्टेअरिंग आल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत, या प्रश्नावर अजित पवार यांनी राजकीय उत्तर देण्याच टाळत एकदम छान वाटल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.