शिवसेना नेमकी कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रते बद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. निकालानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती असून अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे गटाने नार्वेकरांच्या या निकालावर नाराजी व्यक्त करत निषेध आंदोलन केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्धव ठाकरे गटाने आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. राहुल नार्वेकर यांना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी श्वानाची उपमा देत तसे फलक छापण्यात आले होते.

शिवसेना कुणाची आणि शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल देण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचून दाखवत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे म्हणत त्यांचे १६ आमदार पात्र असल्याचं स्पष्ट सांगितल आहे. या निकालानंतर राज्यासह देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील राजकारण ढवळून निघणारा हा निकाल बघून अनेक नेत्यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. पिंपरी- चिंचवड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको चा प्रयत्न केला. राहुल नार्वेकर यांना श्वानाची उपमा देण्यात आली तसे त्यांचे फोटो फलकावर छापण्यात आले होते. पोलीस आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक समोरासमोर आले होते त्यांच्यात किरकोळ झटापट देखील झाली. नार्वेकर आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.