Premium

पुणे: विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या निवास आणि कार्यालयात करोडो रुपये; पोलिसांनी मागवली पैसे मोजण्याची मशिन

रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानी छापे टाकण्यात आले.

divisional commissioner pune anil ramod caught central crime investigation department accepting bribe pune
रक्कम स्वीकारताना अनिल रामोड यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानी छापे टाकण्यात आले असून, या ठिकाणी तीन ते चार कोटी रुपयांची रक्कम आढळली असून, पैसे मोजण्याची मशिनच पोलीस अधिकाऱ्यांनी मागविली आहे.

रामोड हे मुळचे नांदेड येथील असून, गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात अरिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर काम पहात आहेत. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली होती. ती रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 18:44 IST
Next Story
पुण्यात महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी ‘सीबीआय’चा छापा