पुणे : हेल्थ एटीएमद्वारे ग्रामीण भागातील रहिवाशांना आरोग्य तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. वढू बुद्रुकमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यातून ॲनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या तपासण्या करण्यात येत आहेत. याचबरोबर नागरिकांना टेलिमेडिसीन सेवाही या एटीएमच्या माध्यमातून मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडने (एचएएल) हे हेल्थ एटीएम विकसित केले आहे. आरोग्य तपासण्या आणि आरोग्याशी निगडित माहिती देण्यासाठी तयार केलेले हे टच स्क्रीन किऑस्क आहे. हे क्लाऊड आधारित क्लिनिक असून, त्यातून स्वयंचलित आरोग्य तपासणी व त्वरित निदान अहवाल प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची माहिती ऑनलाईन संकलित करता येते.

आणखी वाचा-सातारा-सांगलीदरम्यान दोन रेल्वे फाटक बंद; रस्ते वाहतूक काही काळ बंद राहणार

केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच या हेल्थ एटीएम प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या रोटरीने सुमारे ३० हजार जणांची रक्तातील साखर आणि हिमोग्लोबीन तपासण्या करण्यासाठी प्रकल्पाला निधी दिला आहे. याप्रसंगी केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. लैला गार्डा, केईएम हॉस्पिटलच्या वढू रूरल हेल्थ प्रोग्रामचे प्रमुख डॉ. आनंद कवडे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष सुधीर बापट आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-राज्यातील ९२.६८ टक्के नवसाक्षर उत्तीर्ण; ३३ हजार ६२७ नवसाक्षरांमध्ये सुधारणा आवश्यक

हेल्थ एटीएमचे फायदे

  • व्यक्तीला आपला मोबाईल क्रमांक नोंदवून चाचण्या करता येणार
  • लोकांच्या मदतीसाठी सध्या एक तंत्रज्ञ उपलब्ध
  • ग्रामीण भागात निदानाची फारशी सुविधा उपलब्ध नसल्याने फायद्याचे ठरणार
  • केईएमच्या मंचर येथील कम्युनिटी हेल्थ रिसर्च युनिटमध्येही लवकरच सुविधा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health checkers health atm unique facility in punes vadhu budruk pune print news stj 05 mrj