पिंपरी : पिंपरी- चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ ( Pimpri Hit and Run ) प्रकरणे थांबायचं नाव घेत नाहीत. पिंपरी गावात कारने पादचारी महिलेला धडक देऊन पसार झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. कार चालकाने जाणीवपूर्वक महिलेला धडक दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. महिलेला धडक देऊन कार चालक फरार झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…पुणे : महापालिकेत दहा कोटींचा ठेका मिळवण्यावरून वाद; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले

पिंपरी- चिंचवड मधील पिंपरी गावात अज्ञात भरधाव कारने पादचारी महिलेला धडक देऊन चालक फरार झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात हिट अँड रनच्या घटना अनेकदा घडल्याचं दिसून आलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run incident in pimpri car driver flees after hitting pedestrian kjp 91 psg