पुणे : विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शनिवारी रात्री साडेआठ वाजता विसर्जन झाले. पहाटे येणा-या मंडळाचे यंदा लवकर विसर्जन झाल्याने मिरवणूक लवकर संपण्याची चिन्हे आहेत. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दगडूशेठ गणपती दाखल झाला. आकर्षक विद्युतरोषणाईचा रथ आणि रथात विराजमान झालेली ‘श्री’ची मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातून साडेचारच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली. बेलबाग चौकात आगमन होताच गणपत्ती बापा मोरयाचा जयघोष करण्यात आला. प्रथेप्रमाणे बेलबाग चौकात आरती झाल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली. बेलबाग चौकात मिरवणूक दाखल झाल्यानंतर दर्शनासाठी गर्दी झाली. गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची धावपळ उडाली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणपती टिळक चोकात आला. पोलीस आयुक्तांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली. मोरया मोरयाच्या जयघोषात श्रींना भावपूर्म निरोप देण्यात आला.