पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी शहरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी, वाकड, निगडी पोलीस ठाण्यातील तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) अंतर्गत तर वाकड, दिघी, पिंपरीतील तीन गुन्हेगारांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई केली. तसेच वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड, पिंपरी परिसरातील १७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख सुरज उत्तम किरवले, यश ऊर्फ पाशा कैलास भोसले, अविनाश प्रकाश माने, गणेश जमदाडे, वाकड ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख रोहित मोहन खताळ, साहील हानीफ पटेल, ऋषीकेश हरी आटोळे, शुभम चंद्रकांत पांचाळ, अनिकेत अनिल पवार, प्रितम सुनील भोसले, शिवशंकर शामराव जिरगे, सुमित सिद्राम माने, गणेश बबन खारे, अजय भीम दुधभाते, मुन्ना एकनाथ वैरागर, कैवल्य दिनेश जाधवर आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख अमन शंकर पुजारी, शिवम सुनील दुबे, रत्ना मिठाईलाल बरुड यांच्यावर मोक्का कारवाई केली. या टोळ्यांवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, अग्निशस्त्रे बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : पुणे : शिरूर लोकसभा लढण्यासाठी अजित पवारांचे विश्वासू विलास लांडे इच्छुक!

वाकड ठाण्याच्या हद्दीतील १४ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे, दहा गुन्हे दाखल असलेला पिंपरी पोलिसांच्या हद्दीतील दिपक सुरेश मोहिते आणि तीन गुन्हे दाखल असलेला दिघी पोलिसांच्या हद्दीतील अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे या तिघांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई केली. त्यांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. तर, वाकड मधील दोन, महाळुंगे एमआयडीसी मधील एक, चिखली मधील एक, देहूरोड मधील दोन आणि पिंपरी मधील ११ अशा एकूण १७ गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यात आनंद किशोर वाल्मिकी, संकेत माणिक कोळेकर,आकाश बाबु नडविन मणी, आशिष एकनाथ शेटे, रोहित उर्फ गब-या राजस्वामी, ऋषिकेश उर्फ श-या अडागळे, सुरज रामहरक जैस्वाल, शुभम राजु वाघमारे, वृषभ नंदू जाधव, शेखर उर्फ बका बाबु बोटे, शुभम अशोक चांदणे, शांताराम मारुती विटकर, अनुराग दत्ता दांगडे, सागर ज्ञानदेव ढावरे, पंकज दिलीप पवार, सोन्या उर्फ महेश श्वेणसिध्द कांबळे, आनंद नामदेव दणाणे या गुन्हेगारांचा समावेश आहे.