पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात गळती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी माजी नगरसेवकांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने संघटनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गव्हाणे हे मेळावा घेऊन काही नगरसेवकांसह लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच युवकच्या पदाधिकाऱ्यांनीही आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर बुधवारी काळभोर आणि वाकडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा : पिंपरी पोलिसांकडून आणखी दोन टोळ्यांवर ‘मोक्का’, आतापर्यंत ९८ गुन्हेगारांवर कारवाई

वाकडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे शहराध्यक्षही होते. काळभोर हे युवकच्या प्रदेश कार्यकारिणीवर कार्यरत होते. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष होते. या दोघांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad two more leaders of ncp ajit pawar to join sharad pawar s ncp pune print news ggy 03 css
Show comments