पिंपरी- चिंचवड : एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत घाडगेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटने प्रकरणी शेखर भरत जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सविस्तर माहिती अशी की, आरोपी प्रशांत घाडगेने त्याची चारचाकी गाडी पिंपरीतील नामांकित सर्विस सेंटरला दुरुस्तीसाठी टाकली होती. परंतु, प्रशांतला गाडीतील पेट्रोल आणि बिलामध्ये फेरफार झाल्याचा संशय आला. यावरून मॅनेजर शेखर भरत जाधव यांच्यासोबत शाब्दिक वाद झाले.

यानंतर प्रशांतने त्याच्या मित्रांना बोलवून मॅनेजर शेखर जाधव याच्यासोबत वाद घातले. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. शेखर जाधवला प्रशांत घाडगेने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपरी पोलिसांनी याबाबत तात्काळ तक्रार घेतली.

घटने प्रकरणी शेखर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास के.एस.बी चौक चिंचवड या ठिकाणी घडली आहे. घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad youth beaten up by goons after dispute video viral on social media kjp 91 css