पिंपरी : दुकानाबाहेरील शेड अनधिकृत असल्याबाबत महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवासह दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार पिंपरी कॅम्प परिसरात घडला.

पंकज बगाडे (वय ४०), गणेश दराडे (वय ५०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याबाबत ५८ वर्षीय व्यावसायिकाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बगाडे हा युवक काँग्रेसचा प्रदेश सचिव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. १७ सप्टेंबर रोजी आरोपी हे फिर्यादी यांच्या दुकानामध्ये आले. तुमच्या दुकानाबाहेरील शेड हे अनधिकृत आहे. त्या बाबत आम्ही पिंपरी-चिंचवड महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून फिर्यादींकडे ५० हजार रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाही, तर मोटार अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी २६ सप्टेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी फिर्यादी यांच्या ओळखीच्या दुकानदारांना यापूर्वी अशीच धमकी देऊन वेळोवेळी पैशाची मागणी केल्याचे तपासत उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे तपास