Premium

हडपसरमध्ये विसर्जन मिरवणुकीत स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एकाला मारहाण; दांडके उगारुन परिसरात दहशत

स्पीकरचा आवाज मोठा असल्याने बाळासाहेब घुले आणि कुटुंबीयांनी आरोपींना आवाज कमी करण्यास सांगितले.

50 year old man beaten in pune, boys beat 50 year old man, low volume of speakers, ganesh visarjan 2023, pune ganeshotsav 2023
हडपसरमध्ये विसर्जन मिरवणुकीत स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एकाला मारहाण (संग्रहित छायाचित्र)

पुणे : विसर्जन मिरवणुकीत स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एकास दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षल सुरेश घुले (वय २०, रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील उर्फ बिट्या संजय कुचेकर, कैलास संतोष घुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेब वसंत घुले (वय ५०, रा. विठ्ठल मंदिराजवळ, मांजरी गावठाण) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : जेजुरीच्या खंडोबा गडाला प्राप्त होणार ऐतिहासिक वैभव, विकास आराखड्यातून दुरुस्तीचे काम वेगात

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune 50 year old man beaten with stick for saying decrease the volume of loud speaker during ganesh visarjan pune print news rbk 25 css

First published on: 26-09-2023 at 16:06 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा