पुणे : सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात मध्यरात्री एका भंगार मालाच्या गोदामाला आग लागली. आगीत गोदामातील प्लास्टिक साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुणे : ‘आम्ही भाई आहोत’ म्हणत कोयते उगारणारी टोळी गजाआड; दहा जणांना अटक, ‘मकोका’नुसार कारवाई

हेही वाचा… महाराष्ट्र केसरी स्पर्धा; गतविजेत्या पृथ्वीराजला पुण्याच्या माऊलीचा दणका

नऱ्हे भागातील श्री कंट्रोल चौकाजवळ मघ्यरात्री एका भंगार मालाच्या गोदामास आग लागली. भंगार माल गोदामाच्या परिसरात सोसायटी आहेत. भंगार माल गोदामातील प्लास्टिक साहित्य जळाल्याने मोठा धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. भंगार माल गोदामातील मालाने पेट घेतल्यानंतर आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानाने अर्धा तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a fire broke out at a scrap godown in narhe area at night rbk 25 asj