पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यास गेल्या होत्या. रोहित पवार यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, असे आरोप प्रत्यारोप या प्रकरणावरून होण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणी काय आरोप करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. चौकशी करण्याचे अधिकार असतात, ते बोलवतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे असतात. माझी पण ५ तास चौकशी झाली होती. ते मला चांगलं आठवत आहे. माझ्याकडे पण इन्कम टॅक्सचे लोकं आले होते. पण आम्ही एवढा प्रोपेगंडा करत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”

अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही लोकांना गोळा करत नाही. तसेच आम्ही त्याचा इव्हेंट करीत नाही. आजपर्यंत किती तरी लोकांना त्यांनी (ईडी कार्यालयाने) बोलवले आहे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन येतात. त्यामुळे कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच चौकशीसाठी कोणी कुठे हजर रहायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना टोला लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ajit pawar criticises rohit pawar supriya sule on the issue of ed notice svk 88 css
First published on: 26-01-2024 at 12:28 IST