पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील गुंड गजानन मारणे यांची कोथरूड येथे भेट घेतली. पार्थ पवार यांच्या सोबत पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी देखील होते. तर पार्थ पवार आणि गुंड गजानन मारणे या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहीती घेत आहे.

हेही वाचा : गुंड गजानन मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी
gathering of wrestlers pune
मी काही स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला आलो नाही : अजित पवार

अजित पवार पुढे म्हणाले, काही कार्यकर्ते एका घरात (पार्थ पवार) यांना घेऊन गेले आणि ती व्यक्ती (गजानन मारणे) तिथे होती. हे अजिबात असं घडता कामा नये. माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना एकदा असंच आझम पानसरे या माझ्या कार्यकर्त्यानी एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो पक्षप्रवेश कोणाचा आहे. याबद्दल मला काही माहित नव्हते. पण तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा (बाबा बोडके) होता. त्या व्यक्ती संदर्भात माहिती समोर येताच दुपार पर्यंत त्याला पक्षातून काढून टाकले. ही घटना माझ्या सोबत घडल्यानंतर मी पोलिसांना सांगितले की, गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आमच्या आजूबाजूला असल्यास त्यांना आमच्या जवळ येऊ देऊ नका असा आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत पार्थ पवार यांच्या सोबत तुमची चर्चा झाली का ? त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी रात्री उशीरा पुण्यात आलो असून थेट येथील कार्यक्रमाला आलो आहे. त्याच्या सोबत भेट झाल्यावर नक्की सांगणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.