Eknath Shinde in Pune: मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळी क्षेत्र ९२.५८ टक्के भरले आहे. तर २६.९९ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणामधून २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे सिंहगड रोड परिसरातील नदी काठच्या भागातील सोसायटींमधील घरात पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Pune : लोकांना घाबरवण्यासाठी रेस्तराँमध्ये गोळीबार, मुळशीतला बांधकाम व्यावसायिक गजाआड

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंहगड रोडवरील एकतानगरी मधील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी एका चिमुकल्याने हातामध्ये ‘एकनाथ काका आम्हाला प्लीज भिंत बांधुन द्या!!!’ असा फलक हातात घेतला होता.

हा फलक घेतलेला मुलगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या मुलाशी संवाद साधला. भिंत बांधण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिमुकल्याला दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune flood affected child told cm eknath shinde that eknath uncle please build us a wall khadakwasla dam water svk 88 css