पुणे : मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी दुकानांवर दगडफेक करीत बोर्ड फोडण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब कारभार, अर्थशास्त्राला दुय्यम स्थान

मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दुकान, हॉटेलवर असणार्‍या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसैनिक आंदोलन करीत आहे. आमच्या भूमिकेची दखल न्यायालयाने देखील घेतली. राज्यातील दुकान, हॉटेल यावरील मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर आज आम्ही आंदोलन केले आहे. ही आंदोलनांची सुरुवात आहे. पण भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

पोलिसांनी साईनाथ बाबर यांना घेतले ताब्यात

पोलिसांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना ताब्यात घेतले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांची तोडफोड करणाऱ्या आक्रमक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांवर असणाऱ्या इंग्रजी पाट्यांवर दगडफेक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune maharashtra navnirman sena sainath babar stone pelting on english name boards of shops at jm road svk 88 css