Premium

हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुषखबर; राज्य सरकार देणार वर्षभरात एवढी घरे

येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत तब्बल एक लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देऊ, असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री सावे यांनी म्हटले आहे.

atul save on housing schemes, house to 1 lakh family in 1 year atul save
हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुषखबर; राज्य सरकार देणार वर्षभरात एवढी घरे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. स्वप्नातील घर प्रत्यक्षात येण्यासाठी येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत तब्बल एक लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देऊ. तसेच मुंबईतील सुमारे ७५ हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पुण्यात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीचा निकाल जाहीर करण्याच्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री सावे बोलत होते. ते म्हणाले, ‘नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्य आणि केंद्र शासन मिळून पंतप्रधान आवास योजनांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देत आहे. पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले. सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करुन म्हाडावर विश्वास दाखविला आहे. म्हाडाच्या वतीने नागरिकांना पाच लाख १४ हजार घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

हेही वाचा : राज्य मागासवर्ग आयोगाबाबत बहुजन कल्याण मंत्री सावे यांचे मोठे विधान : म्हणाले, ‘मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित होते, तसे काम…’

मुंबईतील सुमारे ७५ हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्यात येत आहे. आगामी काळातही विविध उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पुणे विभागात विविध गृहनिर्माण योजनेकरिता शासकीय भुखंड उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती द्यावी, अशा सूचना सावे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune minister atul save assure to provide houses to 1 lakh families under various housing schemes in 1 year pune print news psg 17 css

First published on: 05-12-2023 at 16:32 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा