पुणे : गुढी पाडव्यामुळे फळभाज्यांना बेताची मागणी राहिली. घाऊक बाजारात मटार वगळता बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुढीपाडव्यामुळे फळभाज्यांना बेताची मागणी होती. मटार वगळता बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ५ ते ६ टेम्पो शेवगा, राजस्थानातून २ टेम्पो गाजर, हिमाचल प्रदेशातून दोन ट्रक मटार, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ५५ ते ६० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाट्याची आवक झाली.

कोथिंबीर, मेथीच्या दरात घट

कोथिंबीर, मेथीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली. चाकवत, पुदिना, अंबाडी, मुळे, चुका, राजगिरा, चुका, चवळई, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात कोथिंबीर ९० हजार जुडी, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ५०० ते १२००, मेथी – ८०० ते १२००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात- ८०० ते १२००, चाकवत – ५०० ते ६००, करडई- ३०० ते ६००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ८०० ते १२००, राजगिरा- ४०० ते ६००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-६००, पालक- ८००- १२००

पपईच्या दरात घट

पपईच्या दरात घट झाली आहे. लिंबू, अननस, डाळिंब, कलिंगड, संत्री, मोसंबी, खरबूज, पेरु, चिकूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ४० ते ५० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो, चिकू दोन हजार खोकी, पेरू १५० ते २०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ६ ट्रक अशी आवक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune vegetable prices on gudi padwa 2025 pune print news rbk 25 css