पुणे : ओदिशातून महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात आलेला दोन कोटी २० लाख रुपयांचा गांजा केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. सोलापूर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी सुधीर चव्हाण (वय ३२, रा. नरसिंगपूर, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. ओदिशातून मोठ्या प्रमाणात गांजा महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर एक पथक सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात आले. गांजा पाठविण्यात आलेल्या ट्रकची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा लावून ट्रक अडविला. ट्रकची तपासणी करण्यात आली. तेव्हा ट्रकमध्ये गांजा आढळला, अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली.

हेही वाचा : Pune Accident : पोर्श गाडीत दोष की तांत्रिक बिघाड? तपासणीनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती!

सुधीर चव्हाण गांजा आणण्यासाठी ट्रक घेऊन ओदिशात गेला होता. गांजाची सोलापूर जिल्ह्यात विक्री करण्यात येणार होती. सोलापूरमधून गांजा राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विक्रीस पाठविण्यात येणार होता. गांजा विक्री, तसेच तस्करी प्रकरणात आणखी कोण सामील आहे का ?, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती वनगे यांनी दिली.

हेही वाचा : शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या घटना किती? युजीसीने मागवली माहिती…

कारवाई टाळण्यासाठी कोंबडीची विष्ठा ट्रकमध्ये

गांजा बाळगणे, तसेच विक्री करणे अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात ट्रक अडविला. तेव्हा गांजाचा वास येऊ नये म्हणून कोंबड्यांची विष्ठा पोत्यांमध्ये भरण्यात आल्याचे उघडकीस आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur ganja of rupees 2 crore from odisha seized by custom department pune print news rbk 25 css