लोणावळा : सलग सुट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात पर्यटकांची गर्दी झाली. लोणावळा, खंडाळा, पवनानगर परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवार, रविवारच्या सुटीला जोडून सोमवारी बकरी इदची सुटी जोडून आल्याने शनिवारी सकाळपासून मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटकांनी गर्दी केली होती. लोणावळ्यात अद्याप पाऊस सूरू झाला नाही. दोन दिवसांपूर्वी लोणावळा शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार भारत सासणे यांच्या कादंबरीला जाहीर, देविदास सौदागर यांची ‘उसवण’ युवा पुरस्काराची मानकरी

पाऊस झाल्याने सायंकाळनंतर लोणावळा परिसरात आल्हादादायक गारवा अनुभवायला मिळत आहेत. शनिवारी दुपारनंतर लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली. पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. शहरातील हाॅटेल, फार्म हाऊस, बंगले पर्यटकांनी मुक्कामाचे नियाेजन करून सोमवारपर्यंत आरक्षित केले असल्याची माहिती हाॅटेल चालकांनी दिली. शहर परिसरातील कोंडी दूर करण्यासाठी लोणावळा ग्रामीण, शहर पोलिसांकडून पवनानगर परिसर, कार्ला फाटा, मळवली, भाजे लेणी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lonavala crowded with tourists due to consecutive holidays also traffic jam pune print news rbk 25 css