पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आला असून, काही गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. विशेष ब्लॉकमुळे २९ जुलैला पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद डेमू, पुणे-बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड मेमू, दौंड-बारामती डेमू, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू, पुणे-दौंड-पुणे डेमू, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आणखी वाचा-पुणे रेल्वे स्टेशनवरून रिक्षा हवीय? आता मदतीसाठी २४ तास रिक्षामित्र! याचबरोबर ३० जुलैला पुणे-सोलापूर एक्स्प्रेस, हुजूर साहेब नांदेड- पनवेल एक्स्प्रेस, पनवेल - हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू, हडपसर-सोलापूर डेमू, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, अमरावती-पुणे, दौंड-निजामाबाद डेमू, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, हडपसर-दौंड डेमू, बारामती-पुणे डेमू, पुणे-बारामती डेमू, पुणे -दौंड मेमू पैसेंजर, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, दौंड-सोलापुर-दौंड डेमू, पुणे-हरंगुल-पुणे स्पेशल या गाड्या रद्द करण्या आल्या आहेत. रेल्वेने ३१ जुलैला पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, हडपसर-सोलापूर डेमू, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद डेमू, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, दौंड-हडपसर डेमू, बारामती-पुणे डेमू, पुणे-बारामती डेमू, पुणे-दौंड मेमू पैसेंजर, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-दौंड-पुणे डेमू, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू या गाड्या रद्द राहतील. आणखी वाचा-पुणे : आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त १ ऑगस्टला पुणे- सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-सोलापूर एक्स्प्रेस, पुणे-सोलापुर-पुणे एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद डेमू, पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, पुणे-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड -बारामती डेमू, दौंड-हडपसर डेमू, बारामती-पुणे डेमू, पुणे-बारामती डेमू, पुणे-दौंड मेमू पैसेंजर, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, दौंड- पुणे डेमू, साईंनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.