पुणे : बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती आदित्य ठाकरे यांची झाली : आमदार गोपीचंद पडळकर | MLA Gopichand Padalkar criticized MLA Aditya Thackeray regarding Janakrosh Morcha svk 88 | Loksatta

पुणे : बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती आदित्य ठाकरे यांची झाली : आमदार गोपीचंद पडळकर

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

पुणे : बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती आदित्य ठाकरे यांची झाली : आमदार गोपीचंद पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जनआक्रोश मोर्चा बाबत भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना विचारले असता ते म्हणाले की,बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती आदित्य ठाकरे यांची झालेली आहे. तुमच्याकडे अनावधानाने आणि विश्वासघाताने सत्ता आली होती. तुमच्या घरात अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद होत आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री होतात.ज्यावेळी महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या आधाराची गरज होती.तीन वेळा महापूर,तीन वेळा अतिवृष्टी, तसेच वादळ आल. त्याच दरम्यान जागतिक करोना महामारी आपल्या राज्यात देखील आली.अशा काळात लोकांमध्ये येऊन आधार देण्याची आवश्यकता होती.अनेकांना सुविधा मिळाल्या नाहीत.त्यामुळे उपचाराविना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या काळात आधार देणे गरजेचे होते.तेव्हा घराबाहेर पडला नाहीत.आता तुमच्या हातून सगळ गेल्यावर लोकांमध्ये जात आहात. आता त्याचा काही उपयोग होणार नसल्याचे सांगत शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा >>> पुणे : वेदान्ताबरोबर केलेल्या कराराची प्रत, जागेचा शासन निर्णय दाखवा ; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिआव्हान

बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या भावना बदल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा तीन दिवसीय बारामती दौरा झाला.त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांना विचारले असता ते म्हणाले की,भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी मार्फत देशातील १४४ मतदार संघ निवडले आहेत.ज्या ठिकाणी भाजपचा खासदार नाही.त्यापैकी पाश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे लोकसभा मतदारसंघ हातकणंगले, कोल्हापूर,बारामती आणि शिरुर हे आहेत.त्या मतदार संघावर राज्यातील एक खासदार आणि एक मतदार प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवसीय बारामती दौर्‍यावर आल्या होत्या.त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या भावना बदल्या आहेत. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत बारामतीमधून भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येईल.अस वातावरण बारामतीमध्ये झाल असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : वेदान्ताबरोबर केलेल्या कराराची प्रत, जागेचा शासन निर्णय दाखवा ; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिआव्हान

संबंधित बातम्या

पुणे: मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश
पुण्याच्या कात्रजमध्ये मोटारीला वाट न दिल्याने टेम्पोचालकास बेदम मारहाण; मोटारचालक अटकेत
जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; वाचा राज्यभरातील घडामोडी एका क्लिकवर
महिला शिक्षिकेकडून तब्बल कोटींची संपत्ती हनुमान मंदिराला दान; मुलं आणि पती नाराज
Second Hand Car खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होणार…
एड्सग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ‘ई निरंतर’ सेवा
…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा