पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे,पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल नाईक यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी धीरज घाटे यांनी यावेळी केली. ते म्हणाले की या मागणीसाठी आजपर्यंत प्रशासनासोबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement of hindu organizations in pune municipal corporation to demand removal of encroachment of mosque in puneeshwar temple area svk 88 amy