लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : भारतीय जनता पक्षाचे सक्रिया सदस्य आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांनाच यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळेल. कोण कोणाच्या जवळचा असला तरी, सदस्य नसल्यास संधी तिकिट मागण्याचीही संधी मिळणार नाही, अशी तंबी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी भाजप कार्यकर्त्यांना दिली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे विभागातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी संघटन पूर्व कार्यशाळ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, विक्रांत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, भाजपने १ कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी १ कोटी १६ लाख प्राथमिक नोंदणी पूर्ण झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशाच्या जोरावर हे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहेत. हे उद्दीष्ट फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत साध्य करायचे असून त्यासाठी येत्या १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. प्राथमिक सदस्य नोंदणी ही नेत्यांसाठी नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार असलेल्या कार्यकर्त्यांसाठी आहे. निवडमुकीत मतदान करणाऱ्या प्रत्येकाला पक्षाशी जोडून घेणे आणि त्याला भाजपचा सक्रिया सदस्य करून घेणे आवश्यक आहे. पक्षाच्या सक्रिय सदस्याला आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांना यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळणार आहे. सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महापारै, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष महायुतीचे निवडून येतील.

दरम्यान, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, मंडल अधिकारी ही आपली ताकद आहे. त्यावर विधानसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. त्यामुळे नेत्यांनी दिलेले उद्दीष्ट यापुढेही पूर्ण करावे लागणार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not active member no chance in elections chandrashekhar bawankule warn pune print news apk 13 warn mrj