गणेशोत्सवात परगावाहून तसेच शहर परिसरातून देखावे पाहणाऱ्या येणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक पोलिसांनी १९ ठिकाणी वाहने लावण्याची जागा उपलब्ध करुन दिली आहे. गौरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. रविवारपासून (४ सप्टेंबर) १९ ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत (८ सप्टेंबर) १९ ठिकाणी वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी (९ सप्टेंबर) वाहने लावण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची – नानासाहेब पेशव्यांनी तातडीने बांधून घेतलेला ‘लकडी पूल’

४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना वाहनतळ, मिलेनियम प्लाझा वाहनतळ (फर्ग्युसन रस्ता), लँडमार्क वाहनतळ (शिरोळे रस्ता, शिवाजीनगर), यश एंटरप्रायजेस (फर्ग्युसन रस्ता), नदीपात्र पुलाची वाडी सर्कस मैदान मोकळी जागा, न्यू इंग्लिश स्कुल, रमणबाग, बालभवनसमोर सारसबाग बजाज पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, हमालवाडा पार्किंग (शिवाजीराव आढाव वाहनतळ, नारायण पेठ), गोगटे प्रशाला (नारायण पेठ), स. प. महाविद्यालय (टिळक रस्ता), काँग्रेस भवन, अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान (शिवाजीनगर), पूरम चौक ते हॅाटेल विश्व सारसबाग रस्त्याच्या डाव्या बाजूला, एच. व्ही. देसाई महाविद्यालय, शनिवार वाडा (पोलिसांच्या वाहनासाठी )

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parking facility at 19 places during ganeshotsav in pune print news tmb 01