पिंपरी : म्हाळुंगे एमआयडीसीमधील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे ११ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी घडली असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

कृष्णा जाधव (वय ३०, रा. खराबवाडी, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळवारी सायंकाळी कंपनीत आले. त्यांनी ११ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम कंपनीच्या पूर्वीच्या कंत्राटदाराकडे देण्यास आरोपींनी सांगितले. खंडणी न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.