पिंपरी : हॉटेलमधील कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मोशी येथे स्वच्छ भारत योजनेतून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. हॉटेलमधून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. बायोगॅसची निर्मिती झाल्यानंतर या बायोगॅसपासून सीएनजीची निर्मिती करून हा सीएनजी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेच्या इंधन खर्चामध्येही बचत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट किंवा विविध भागांतून मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण होत आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने मोशी येथे स्वच्छ भारत योजनेतून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे.

हेही वाचा…“पक्षातून बाहेर पडल्यानंतर जास्त त्रास होतोय”, वसंत मोरेंची रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीनंतर प्रतिक्रिया; आता अपक्ष निवडणूक लढवणार!

सद्यस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात ३५ ते ३८ टन हॉटेल वेस्ट निर्माण होत आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पुढील ३० वर्षांचा विचार करून भविष्यात या प्रकल्पाची क्षमता २०० टन प्रतिदिन इतकी वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळणार असून हॉटेल वेस्ट तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.

या प्रकल्पाद्वारे महापालिकेने शहर शून्य कचरा होण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. कचरा वाहतुकीची सर्व वाहने याच प्रकल्पातून तयार होणाऱ्या इंधनावर चालविण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पातून तयार होणारा सीएनजी खुल्या बाजारात विक्रीसाठीही उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…‘शिरुर’मधून विलास लांडे यांची तलवार म्यान?

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

शहरातील हॉटेल, खाणावळी, मंगल कार्यालय, उपाहारगृहातून गोळा होणारा ओला कचरा विशेष ‘जीपीएस’ यंत्रणा असणाऱ्या बंदिस्त गाडीतून संकलित केला जाणार आहे. विलगीकरण करून प्रक्रिया केली जाणार आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाची क्षमता ५० टन प्रतिदिन इतकी असून, टप्प्याटप्प्याने २०० टन प्रतिदिनपर्यंत वाढविली जाणार आहे. बायोगॅसपासून सीएनजी बनविला जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipality going to convert hotel waste to cng with new biogas plant at moshi pune print news ggy 03 psg