पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांना तलवार म्यान करावी लागण्याची चिन्हे आहेत. दोन्ही वेळेस शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवारामुळे लांडे यांना माघार घ्यावी लागली आहे, तर भाजपचे भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे दिल्लीला जाण्याचे स्वप्न या वेळीही अधुरे राहणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघ येतो. विलास लांडे यांनी २००९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. सन २०१९ मध्येही त्यांनी जोरदार तयारी केली. परंतु, ऐन वेळी शिवसेनेतून आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने त्यांची संधी हुकली होती. राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. महायुतीत शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे निश्चित झाल्याने लांडे यांनी पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागितली. मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल, तर आयात उमेदवार देऊ नका. भाजपचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी. त्यांचे काम करायला मी तयार आहे. भोसरीत मी आणि लांडगे एकत्र आलो तर कोठेही अडचण येणार नाही. आम्ही एकतर्फी निवडणूक काढू, असा विश्वास व्यक्त करत लांडे यांनी आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता; पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडे यांची मागणी फेटाळली.

Advocate Ujjwal Nikam
मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर, पूनम महाजन यांचा पत्ता कट
Sharad Pawar press conference _ 4
“त्यांची फाईल आज टेबलवरून कपाटात, पण उद्या…”, भाजपाबरोबर गेलेल्या नेत्यांना शरद पवारांचा इशारा
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
MLA vaibhav naik On kiran samant
“किरण सामंत यांना उमेदवारीसाठी राणेंची लाचारी करावी लागतेय…”; वैभव नाईक यांनी डिवचलं

हेही वाचा…२५ हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना? संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दोन दिवसांत उमेदवारी जाहीर होईल, असे पवार यांनी सांगितले. आढळराव यांची उमेदवारी निश्चित झाल्याने लांडे यांची दुसऱ्या वेळी निवडणूक लढविण्याची संधी जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवारामुळे लांडे यांना माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लांडे आता पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे तिकडे गेले तरी लांडे यांना उमेदवारी मिळणार नाही. लांडे यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. पवार यांचे छायाचित्र आपल्या देवघरात असल्याचे लांडे सांगतात. नुकतेच शहरातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी डॉ. कोल्हे काम चांगले करतात, पण पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीला कोणी तरी पाठिराखा पाहिजे होता. लांडे यांच्यासारखा दुसरा पाठीसारखा असू शकत नाही. त्यांच्यासारखा शक्तीशाली माणूस दिसत नाही, असे विधान केले होते. त्यामुळे महायुतीत उमेदवारीची संधी न मिळालेले लांडे खरच डॉ. कोल्हे यांच्या पाठिशी उभे राहतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, याबाबत लांडे यांच्याशी संपर्क साधला असता आपण बैठकीत असल्याचे सांगत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.

हेही वाचा…देशात कापसाचे उत्पादन वाढणार ?जाणून घ्या, सीएआयचा अंदाज

महेश लांडगे यांचेही दिल्लीचे स्वप्न अधुरे

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचीही दिल्लीत जाण्याची तीव्र इच्छा आहे. सन २०१९ पासून ते तयारी करत असून, युतीमध्ये संधी मिळत नाही. मागील वेळी शिवसेनेला आणि या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ गेल्याने लांडगे यांचे या वेळीही दिल्लीला जाण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे.