पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलिसांवर टीका होत असताना अजित पवारांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी चांगली कामगिरी करत आरोपीला बेड्या ठोकल्याचे उदगार काढले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना याबाबत कोणाचीही गय न करण्याची आणि राजकीय हस्तक्षेप होणार नाही. याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळत आरोपींना अटक केली आहे. अजित पवारांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. विचारपूस करत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना कुणाचीही गय न करण्याचे आदेश दिले होते. राजकीय हस्तक्षेप होणार नाही. याची काळजी घेण्यास सांगितले होते. पिंपरी -चिंचवड पोलिसांनी आधीच तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोललो. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे वारंवार लोकेशन बदलत होते. गाडी बदलत होते. तरी देखील पिंपरी- चिंचवड पोलीसांनी जुळवाजुळव करून चांगली कामगिरी करत आरोपींना अटक केली. हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवल जाणार असून तातडीने निकाल लागेल अशी अपेक्षा आहे.
निलेश चव्हाण प्रकरणी पुणे सिपी यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्या प्रकरणात त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एकूणच हे सगळं प्रकरण बघता ही केस स्ट्रॉंग केली जाईल. पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. अस कस्पटे कुटुंबाचं म्हणणं असल्याचे देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं. हत्येचा गुन्हा दाखल केला आणि पुरावे नसतील तर ती केस स्ट्रॉंग राहणार नाही. त्यामुळे पुराव्याच्या आधारे हे प्रकरण हाताळले जात असल्याचे देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. हे प्रकरण संवेदनशील असून त्यांचा या प्रकरणात दबक्या आवाजात सहभाग असल्याचे बोलले जात असून फोन कनेक्शन आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिला.