पुणे : नाना पेठेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच, त्या खुनातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची बंडू आंदेकर टोळीतील दोघांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती. त्या खुनाच्या प्रकरणी मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह 15 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर याला अटक केल्यानंतर आंदेकर टोळीतील अनेक घटनासमोर येण्यास सुरुवात झाली.
गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील मासेविक्रेत्यांना तब्बल 12 वर्षांपासून दहशतीखाली ठेऊन तब्बल 20 कोटी रुपयांहून अधिक पैशांची खंडणी उकळल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. या प्रकरणी टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील महिलेसह 11 जणांविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रोटेक्शन मनी, व्यापाऱ्यांना धमकावून जागा मिळवून देणे, व्यवहारात सहकार्य करून देतो, या नावाखाली आजवर अनेक जणांकडून खंडणी वसूल केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आले आहे.