MSBSHSE Maharashtra HSC 12th Board Result Passing Percentage राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला. त्यात पुणे जिल्ह्याने ९३.२० टक्क्यांसह विभागात आघाडी घेतली. पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्ष मंजुषा मिसकर आणि सचिव औदुंबर उकिरडे यांनी निकाल जाहीर केला. पुणे विभागातील २ लाख ६० हजार ३८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २ लाख ५८ हजार ६०८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ४० हजार ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १६ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ७९४ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर ११ हजार २१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.७७ आहे. तर नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून ९२.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पुणे जिल्ह्यातून एकूण १ लाख ३८ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ३८ हजार १५२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २८ हजार ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अहमदनगर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या ६४ हजार ३९२ विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ५८ हजार ९६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी ९२.३३ टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यातील ५७ हजार ४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५६ हजार ५९९ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी ९२.९७ आहे.

हेही वाचा : Maharashtra 12th HSC Results 2024 Declared: बारावीचा निकाल जाहीर… मुलींनी मारली बाजी

शाखानिहाय निकाल

पुणे जिल्ह्यातून विज्ञान शाखेतील ७८.५४ टक्के, कला शाखेतील ६७.०५ टक्के, वाणिज्य शाखेतील ६६.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे ६८.१६ टक्के, कला शाखेचे ५१.५१ टक्के, वाणिज्य शाखेचे ४७.०१ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे ७४.७७ टक्के, कला शाखेचे ७८.३६ टक्के, वाणिज्य शाखेचे ७७.५५ टक्के उत्तीर्ण झाल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाने दिली.