लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) कार्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेली ड्रोन प्रणाली गेल्या वर्षी ऑगस्टपासून वापरण्यात येत आहे. या प्रणालीतील अद्ययावत डिफरेंशियल ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (डीजीपीएस) आणि कॉर्स तंत्रज्ञान असलेले ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत. नगर रचना योजनांची आखणी व विकास, नदी सुधार प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि सुविधा क्षेत्राचे हस्तांतर, अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण यांसाठी या ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएकडून प्रामुख्याने नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया, अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्याकरिता ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. पीएमआरडीए क्षेत्रात सुमारे ८१४ गावांचा समावेश असून एवढ्या मोठ्या क्षेत्राची निगराणी ठेवण्याकरिता पीएमआरडीए कार्यालयाकडून डीजीपीएस, कॉर्स असलेले अद्यावत तंत्रज्ञान असलेले ड्रोन खरेदी करण्यात आले आहे. या ड्रोनचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंघला यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा… पुणे: विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, चौघांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, डीजीपीएस, कॉर्स या अद्ययावत तंत्रज्ञान असलेला ड्रोन अधिक कार्यक्षम पद्धतीचा असून पीएमआरडीए कार्यालयामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अद्ययावत करण्यात आले आहेत. पीएमआरडीए कार्यालयातील ड्रोन कक्षाकरीता विशेष कौशल्य असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. हा कक्ष उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असून या कक्षात डॉ. प्रितम वंजारी मुख्य भौगोलिक माहिती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

नगर रचना योजनांची आखणी व विकास, नदी सुधार प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि सुविधा क्षेत्राचे हस्तांतर, अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण यांसाठी पीएमआरडीए या नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करेल. – रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी, पीएमआरडीए

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune metropolitan region development authority pmrda is using a drone system with modern technology pune print news psg 17 dvr