पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा संदेश पाठवून खंडणीची मागणी | Pune MLA Madhuri Misal sent a threatening message and demanded ransom pune print news amy 95 | Loksatta

पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा संदेश पाठवून खंडणीची मागणी

माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा संदेश पाठवून खंडणीची मागणी
आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा संदेश पाठवून खंडणीची मागणी

आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांचे दीर, माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी घोरपडी गाव परिसरात वास्तव्याला असलेल्या एका तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणारा अटकेत ; तीन गुन्हे उघड

याबाबत माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाइल क्रमांकावर आरोपी शेखने संदेश पाठवून खंडणीची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी संदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता़

हेही वाचा >>> शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार; आरोपीस अटक

पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मोबाइल क्रमांक समीर शेख याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. शेख याच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शेख याच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणारा अटकेत ; तीन गुन्हे उघड

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड : … तोपर्यंत स्काय डायनिंग हॉटेल बंद राहणार – पोलिसांनी बजावली नोटीस!
“तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा,” संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं जोरदार आंदोलन, म्हणाले “तुम्ही कोणतं धोतर…”
पुणे: हाॅटेलमध्ये हाणामारी; १३ जणांच्या विरोधात गुन्हा; वारजे भागातील घटना
पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी अटकेत
असुविधांनी झोडपले, कोंडीने छळले..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार