नेता कोणाला म्हणायचे? ज्याच्या मागे-पुढे कार्यकर्त्यांचा लोंढा असणारा, मंत्री नसला तरी एखादा तरी पोलीस संरक्षणासाठी असणारा आणि खासगी अंगरक्षक म्हणजे ‘बाउन्सर’ आजूबाजूला उभे करून मगच ऐटीत चालणारा. त्याशिवाय पुढारी किंवा नेता असल्याची छाप पडत नाही, असा सध्याच्या राजकीय पुढाऱ्यांचा समज झाला आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाचा कोणत्या तरी शहरातल्या गल्लीतल्या शाखेचा अध्यक्ष असलेला पदाधिकारीही याच थाटात समाजात आणि आजूबाजूला वावरत असतो. पण पुण्यासारख्या शहराला पूर्वी ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’चे लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. राजकारणात असूनही कोणताही बडेजाव नसलेले अनेक नेते पुण्याने अनुभवले आणि त्यांचे नेतृत्व पुणेकरांनी स्वीकारले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून आजवर पुण्याचे राजकारण सुरू होते; पण आता आदर्श लोकप्रतिनिधींचा पुण्यातील राजकारण्यांनाही विसर पडल्याने ‘बाउन्सर’च्या तटबंदीत मतदारांशी दुरून संपर्क साधणाऱ्या पुढाऱ्यांची चलती आहे.
नेता कोणाला म्हणायचे?
आदर्श लोकप्रतिनिधींचा पुण्यातील राजकारण्यांनाही विसर पडल्याने ‘बाउन्सर’च्या तटबंदीत मतदारांशी दुरून संपर्क साधणाऱ्या पुढाऱ्यांची चलती आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-11-2024 at 10:23 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSपुणे न्यूजPune Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune people representative behavior pune municipality pune print news spt 17 ssb