पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान उद्या (ता.१०) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-लोणावळा उपनगरी मार्गावर अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेगाब्लॉकमुळे पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७, सकाळी ११.१७, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ४.२५, सायंकाळी ८.०२ वाजता सुटणाऱ्या गाड्या रद्द राहतील. याचबरोबर शिवाजीनगरहून तळेगावला दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल आणि शिवाजीनगरहून लोणावळ्याला सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल या गाड्या रद्द असतील.

आणखी वाचा-पुण्यात साकारलेल्या सूट दुर्बिणीची मोठी कामगिरी, टिपली सूर्याची प्रकाशचित्रे!

तसेच, लोणावळ्यातून पुण्याला दुपारी २.५०, रात्री ७ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. लोणावळ्यातून शिवाजीनगरला सकाळी १०.०५, सायंकाळी ५.३० आणि रात्री ७.३५ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तळेगावहून पुण्याला सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकलही रद्द असेल.

याचबरोबर एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी सुमारे साडेतीन तास विलंबाने धावणार आहे. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway mega block tomorrow many trains departing from pune have been cancelled pune print news stj 05 mrj