पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द राहणार असून, काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे, शिवाजीनगरहून रद्द लोकल गाड्या :

१. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

२. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

३. शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी १२.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

४. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५. शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

६. पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

७. शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

हेही वाचा – पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद

लोणावळा, तळेगावहून रद्द लोकल गाड्या :

१. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

२.लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी ११.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

३. लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

४. तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५.३०वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

६. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

७. लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

हेही वाचा – बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका

विलंबाने धावणाऱ्या गाड्या :

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस साडेतीन तास विलंबाने धावेल. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway megablock many trains will be canceled between pune and lonavala some will run late pune print news stj 05 ssb
First published on: 01-03-2024 at 20:31 IST