बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.या हत्येमागे वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर तब्बल 20 दिवस वाल्मिक कराड फरार होते.काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले आणि काल रात्री उशिरा बीड येथील केज न्यायालयात हजर करण्यात आले.त्यावेळी बराच काळ दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर सरकारी वकिलांची मागणी मान्य करीत वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.त्याच दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधत अनेक घडामोडी बाबत भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये मागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप असून आता पोलिसांनी अटक केली आहे.त्या रामदास आठवले म्हणाले की, बीड येथील संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.माणुसकीला कलंक लावणारी घटना घडलेली आहे.तसेच या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा तब्बल 20 दिवसानंतर स्वतः हून पोलिसांसमोर हजर झालेला आहे. तसेच आतपर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी,त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असून त्याच्यावर कडक कलम लावून शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी सुरवातीपासून सर्वांची आहे.आता वाल्मिक कराड कोठडीमध्ये असून त्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाला आता उपक्रमांची जोड; शालेय शिक्षण विभागाचा आदेश

तसेच ते पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्य़ात गुंडागर्दी करणारी, खंडणी मागणारी जी टोळी आहे.तसेच उद्योग व्यवसाय करणार्‍या लोकांना त्रास देणारे जे लोक आहेत.त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी टोळी घेऊन फिरण,त्यामुळे ही बाब गंभीर असून अशा लोकांना कडक शासन झाल पाहिजे.तसेच त्या जिल्ह्यात वाल्मिक कराड हा कार्यकर्त्यांच्या नावाने गुंडगिरी करणारा आहे.आता त्याला अटक करण्यात आली असून त्याला शिक्षा झालीच पाहिजे.तसेच बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास,वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा…थकबाकीदारांची आता नळजोडतोडणी; परिमंडळनिहाय पथकांची नियुक्ती

वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.त्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे मित्र होते. ही बाब जरी खरी असली तरी धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काही एक संबध नाही.माझ्या जवळचा कोणी ही असला तरी कारवाई करावी,अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी यापुर्वी मांडली आहे.त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale said valmik karad is masterminded in santosh deshmukhs murder and should be severely punished svk 88 sud 02