पिंपरी : चिखली पोलीस ठाण्याला हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी चिखली प्राधिकरण सेक्टर १७ मधील १५ गुंठे जागा पोलीस ठाण्यास देण्यास मान्यता दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निगडी पोलीस ठाण्याचे विभाजन करून चिखली पोलीस ठाण्याची निर्मिती २०१८ मध्ये झाली. तेव्हापासून पोलीस ठाण्याचा कारभार पूर्णानगर येथील भाडेतत्त्वावरील जागेतून सुरू आहे. तिथे वाहनतळ नाही. अधिकारी व विविध विभागांचे कक्ष उभारणीसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता होती. चिखली पोलीस ठाण्यासाठी सेक्टर १७ मधील स्पाइन रस्त्यालगतची घरकुल प्रवेशद्वारासमोरील महापालिकेच्या ताब्यात असलेली २० आर मोकळी जागा मिळावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने चिखली प्राधिकरण सेक्टर १७ मधील १५ गुंठे जागा देण्यास मान्यता दिली.

हेही वाचा – पुणे: वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याकडून तोडफोड, कामगारांना मारहाण

चिखलीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पात एकूण १५८ इमारती असून, १५३ इमारतींमधील लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. घरकुल परिसरातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चिखली पोलीस ठाणे हक्काच्या जागेत उभारण्यात येणार आहे. – महेश लांडगे, आमदार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rightful place has been obtained for the establishment of chikhli police station pune print news ggy 03 ssb