पुणे : मध्य रेल्वेने पुणे-बिकानेर ही नवीन विशेष गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे महाराष्ट्राला गुजरात आणि राजस्थानशी जोडले जाणार आहे. पुण्यातून पहिली गाडी उद्या (मंगळवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी रवाना होईल. पुणे-बिकानेर ही विशेष गाडी साप्ताहिक असेल. ही गाडी दर मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून रवाना होईल. ती बिकानेरला दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी बिकानेरमधून दर सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गाडीला लोणावळा, कल्याण, भिंवडी रोड, वसई रोड, वापी, सुरत, बडोदा, आणंद, नडियाद, अहमदाबाद, महेसाना, पालनपूर, अबू रोड, जवाई बांध, फालना, राणी, मेवाड जंक्शन, पाली, लूनी, जोधपूर, गोटन, मेडता रोड, नागौर आणि नोखा हे थांबे आहेत. या गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special railway will connect maharashtra with gujarat rajasthan pune print news stj 05 ysh