पिंपरी- चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत चार पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे येथील गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या दोघांना नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी परिसरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोन्ही कारवाईमध्ये एकूण चार पिस्तूल आणि बारा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी विकी खराडे आणि पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. सांगवीमधून अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी रोहित दर्गेश धर्माधिकारी आणि अनिकेत सतीश काजवे याला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : शिकाऊ डॉक्टरांकडून तपासणी करून पूजा खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र? आयुक्तांचा चौकशीचा आदेश

तळेगावमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिघांना याआधीच अटक केलेली आहे. तर, दोघेजण फरार होते. त्यांना नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. तर दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धर्माधिकारी आणि काजवे हे दोघे अवैधरित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाले होती. त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. तर तिसऱ्या कारवाईमध्ये पाच वर्षांपासून हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुषार उर्फ गोल्या रामराव राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला चाकणमधून अटक करण्यात आली.